नवी दिल्ली - राजधानी दिल्ली आणि पंचकूला पोलिसांच्या संयुक्त तपास कारवाईनंतरही हनीप्रीत पोलिसांच्या हातावर तुरी देण्यात यशस्वी झाली. दोन साध्वींच्या बलात्कार प्रकरणी अटकेतील गुरमीत राम रहिमची कथित कन्या हनीप्रीतच्या शोधात मंगळवारी सकाळी ग्रेटर कैलाश पार्ट टू एन्क्लिव्ह येथील आलिशान बंगला क्रमांक ए-9 येथे छापा टाकण्यात आला. पोलिस पोहोचले तेव्हा बंगल्याचे गेट आतून बंद होते. पोलिसांनी बंगल्याचा केअर टेकर राजीव मल्होत्राला फोन करुन बोलावून घेतले आणि गेट उघडण्यास सांगितले. दोन तास बंगल्यातील प्रत्येक रुमची झाडाझडती घेतली मात्र हनीप्रीत तिथे सापडली नाही. पोलिसांचा छापा पडणार असल्याची माहिती हनीप्रीतला आधीच लागली असण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. पोलिस पोहोचले तेव्हा मागच्या गेटने तिने पोबारा केला असेही सांगितले जात आहे.
बंगला ब्रिगेडियरचा असल्याचा दावा
- ग्रेटर कैलाश येथील पार्ट टू एन्क्लिव्ह ए-9 हा बंगला एका ब्रिगेडियरचा असल्याचा दावा केअर टेकर सुभाषने केला आहे.
- हनीप्रीतने दिल्ली हायकोर्टात दाखल केलेल्या जामीन अर्जावर या बंगल्याचा पत्ता दिला होता. केअर टेकरचा दावा आहे की बंगल्याच्या मागे आणि पुढे दोन्ही बाजूला सीसीटीव्ही कॅमेरे आहेत.
- त्यासोबतच त्याने म्हटले आहे की गुरमीत राम रहिमच्या अटकेनंतर हनीप्रीत येथे कधीही आली नाही.
- मंगळवारी सकाळी 7 वाजता पंचकुला पोलिसांचे एक पथक दिल्लीतील चित्तरंजन पार्क पोलिस स्टेशन येथे पोहोचले. त्यांच्याकडे हनीप्रीतचे वॉरंट होते. पोलिस स्टेशनने दोन पोलिस त्यांच्यासोबत दिले आणि दिल्ली व पंचकुला पोलिसांच्या संयुक्त टीमने बंगल्यावर छापा टाकला.
- दोन तास चाललेल्या झाडाझडतीमध्ये बंगल्यातील कुलुपबंद दोन रुमचे लॉक तोडण्यात आले, मात्र पोलिसांना रिकाम्या हाताने येथून परतावे लागले.

न्यायाधीश संगीता धिंग्रा सहगल यांनी दिला एकमेवर पर्याय
- जामिनाची याचिका फेटाळून लावत न्यायमूर्ती संगीता धिंग्रा सहगल यांनी म्हटले की, ‘पंचकुला न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत खोडा घालण्यासाठीच ही याचिका दाखल करण्यात आली आहे. हनीप्रीत सध्या अटकेपासून बचावाचा प्रयत्न करत आहे. या याचिकेवर सुनावणी करण्यास कोणताही आधार नाही. पंजाब आणि हरियाणा पोलिस तिचा शोध घेत आहेत. त्यामुळे हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात मोडत नाही.’

आता पुढे काय?
हनीप्रीतकडे आता दोन मार्ग उपलब्ध आहेत. ती आता पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात अंतरिम जामिनासाठी याचिका दाखल करू शकते. अथ

Post a Comment