
मुंबई - येथील वेस्टर्न रेल्वे लाइनवरील एलफिन्स्टन स्टेशनवर शुक्रवारी सकाळी चेंगराचेंगरी झाली आहे. या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला असून शेकडो प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमींना केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे.
- मिळालेल्या माहितीनुसार चेंगराचेंगरीची घटना सकाळी 10.45 वाजता घडली. या पुलावर सामान्यपणे रोज सकाळच्या वेळी गर्दी जास्त असते. सेंट्रल आणि वेस्टर्न रेल्वेला जोडणारा हा पुल असल्यामुळे येथे नेहमी गर्दी असते. दरम्यान, उद्या दसरा असल्यामुळे दादर स्टेशनवर गर्दी जास्त असेल, यामुळे अनेक प्रवासी हे एलफिन्स्टन आणि परळ स्टेशनवर उतरत होते. त्यातच पुलाचा एक भाग कोसळल्याची अफवा पसरली आणि भयभीत लोकांनी पुलावरुन उडी मारण्याच्या प्रयत्न केला आणि चेंगराचेंगरीला सुरुवात झाली.
- अग्निशमन दलाच्या गाड्या, पोलिस आणि स्थानिक लोकप्रतनिधींनी घटनास्थळाकडे धाव घेतली आहे. शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर हे एलफिन्स्टन स्टेशनजवळ पोहोचले आहेत.
- पुल कोसळला, शॉर्ट सर्किट झाले अशा अफवा पसरल्यामुळे लोकांनी धावाधाव केल्याचे सरवणकरांनी सांगितले. या अफवांमुळे चेंगराचेंगरी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
- दरम्यान केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल हे आज मुंबई दौऱ्यावर आहेत. त्याच दिवशी अशा प्रकारची घटना झाली आहे. आता तरी केंद्र सरकार सर्वाधिक महसूल देणाऱ्या मुंबई लोकलकडे लक्ष देणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
अधिकारी म्हणाले...
- पाऊस सुरु झाला. तेव्हाच लोकल ट्रेन स्टेशनवर आली आणि स्टेशनवर गर्दी उसळली. काही लोक घसरुन पडले. त्यामुळे ही घटना घडल्याचे रेल्वेच्या दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश रेल्वे प्रशासनाने दिले आहेत.
- अशा घटनांनंतर प्रवाशांना वेळेवर उपचार मिळावे यासाठी रेल्वे प्रशासनाचे प्रयत्न सुरु असल्याचे अधिकारी म्हणाले.
- ब्रिटीश काळात एलफिन्स्टन स्टेशनचे बांधकाम झाले आहे.
- एलफिन्स्टन स्टेशन हे वेस्टर्न रेल्वे लाइनवर आहे.
- एलफिन्स्टन स्टेशनचा पुल हा मध्य रेल्वेच्या परळ स्टेशनला जोडलेला आहे. दोन्ही स्टेशनवरील प्रवासी या पुलावरुन ये-जा करतात.
- एलफिन्स्टन आणि परळ रेल्वे स्टेशनच्या भागात अनेक कार्पोरेट हाऊस आहेत. त्यामुळे सकाळच्या वेळी चाकरमान्यांची येथे मोठी गर्दी असते.
- एलफिन्स्टन स्टेशन हे वेस्टर्न रेल्वे लाइनवर आहे.
- एलफिन्स्टन स्टेशनचा पुल हा मध्य रेल्वेच्या परळ स्टेशनला जोडलेला आहे. दोन्ही स्टेशनवरील प्रवासी या पुलावरुन ये-जा करतात.
- एलफिन्स्टन आणि परळ रेल्वे स्टेशनच्या भागात अनेक कार्पोरेट हाऊस आहेत. त्यामुळे सकाळच्या वेळी चाकरमान्यांची येथे मोठी गर्दी असते.
- एलफिन्स्टन स्टेशन रोडचे नाव बदलून प्रभादेवी करावे अशी बऱ्याच दिवसांपासूनची मागणी आहे.
Post a Comment