0
आधार सक्तीचा असाही अतिरेक, कार्ड नाही म्हणून शिक्षकाची 16 वर्षीय विद्यार्थ्याला बेदम मारहाण

मुंबई - आधरसक्तीचे एक अजब प्रकरण समोर आले आहे. मुंबईतील एका खासगी शाळेतील 16 वर्षांच्या विद्यार्थ्याकडे आधार नसल्यामुळे शिक्षकाने त्याला बेदम मारहाण केली आहे. पालकांच्या तक्रारीनंतर शिक्षकाला अटक करण्यात आले आहे.
विद्यार्थी हॉस्पिटलमध्ये 
- घाटकोपर येथील ऑक्सफोर्ड इंग्लिश हायस्कूलमधील हे प्रकरण आहे. आरोपी शिक्षक श्याम बहादूर विश्वकर्मा याला अटक करण्यात आले आहे. 
- शिक्षकावर आरोप आहे की त्याने सुहैल अन्सारी या विद्यार्थ्याला मारहाण केली. मारहाणीत विद्यार्थ्याच्या डोक्याला जबर जखम झाली आहे. त्याच्या डोक्याला आधीच मार लागलेला होता. तिथेच शिक्षकाने पुन्हा मारले.
CCTV मुळे प्रकरण उघड 
- शिक्षकाच्या मारहाणीत जखमी विद्यार्थ्याला घेऊन जेव्हा पालक शाळेत आले तेव्हा शिक्षकाने सर्व आरोप फेटाळून लावले. 
- त्यानंतर पालकांनी शाळेचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी लावून धरली आणि त्यात आरोपी शिक्षक विश्वकर्मा विद्यार्थ्याला बेदम मारहाण करत असल्याचे उघड झाले.

Post a Comment

 
Top