0


मुंबई - संजय दत्तचा अपकमिंग चित्रपट 'भूमी' वर सेंसॉर बोर्डाने कात्री चालवली आहे. चित्रपटात अदिती राव हैदरीच्या रेप सीनवर सेंसॉरला आक्षेप आहे. तसेच चित्रपटातील साली, आसाराम, गंदा पाणी अशा शब्दांसह कोर्टरूम किसिंग सीनही चित्रपटातून हटवण्यास सांगितले आहे. कोर्टाने एकूण 12 कट लावले आहेत. डायरेक्टर ओमंग कुमार यांच्या मते, त्यांना आधीच माहिती होते की, चित्रपटाला काही कट सुचवण्यात येणार आहेत.

सनी लियोनीच्या गाण्यावरही चालली कात्री..
चित्रपटात सनी लियोनीचे आयटम साँग 'ट्रिपी-ट्रिपी' वरही कात्री चालवण्यात आली आहे. वृत्तांनुसार आता गाण्याचा ठरावीक भागच चित्रपटात दाखवला जाणार आहे. हे गाणे आधीच रिलीज झाले असून चित्रपटात मात्र हे गाणे कटसह दिसणार आहे. संजय दत्तनेही सनी लियोनीचे गाणे व्हल्गर असल्याचे म्हटले होते.

Post a Comment

 
Top