0


जबलपूर - रेड लाइट एरिया फक्त मुंबई-पुण्यातच नाही तर महाराष्ट्राची उपराजधानी देखील यासाठी कुप्रसिद्ध असल्याचे समोर आले आहे. नागपूरमधील गंगा-जमुना एरियातील एका कोठ्यातून सोडवलेल्या मुलीने सांगितले की 12 वर्षांची असताना आईने 80 हजार रुपयांत येथे विक्री केली होती. गेल्या 12 वर्षांपासून येथे तिच्याकडून देहव्यापार करुवून घेण्यात आला. 24 वर्षांच्या तरुणीच्या जबाबावरुन कोठा संचालिका आणि तिच्या जन्मदात्या आईवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहे.
रेड लाइट एरियामध्ये कशे घालवले 12 वर्षे
- शिल्पाकडून गेल्या बारा वर्षापासून नागपूरमधील गंगा-जमुना या रेड लाइट एरियामध्ये देहव्यापार करवून घेतला जात होता. दोन वर्षे तिला मुंबईलाही पाठवण्यात आले होते. 
- देहव्यापारातून मिळाणारा पैसा तिची कोठेवाली ठेवून घेत होती आणि तिला दिवसाला फक्त 20 रुपये खर्चाला दिले जात होते. 
- शिल्पाने दोनवेळा नागपूरमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र तिचे दुर्दैव एवढे की दोन्ही वेळा ती पकडली गेली. 
- फक्त पकडली जाऊन पुन्हा त्याच नरकात राहावे लागणार एवढ्याच तिला यातना नव्हत्या, तर पळून जाण्याची शिक्षा म्हणून बेदम मारहाणही करण्यात आली होती. 
- त्यानंतर या मुलीला मुंबईला पाठवण्यात आले. दोन वर्ष मुंबईला राहिल्यानंतर पुन्हा नागपूरला आणण्यात आले. 
- एक दिवस तिची ओळख शहरातील एका तरुणासोबत झाली. तिने त्याला आपल्या कुटुंबाबद्दल माहिती दिली. 
- तरुणाने तिच्या कुटुंबाला याबाबतची माहिती दिली. तुमची मुलगी नागपूरमधील गंगा-जमुना येथे असल्याचे सांगितले. कुटुंबाने पोलिसांना याची माहिती दिली. 
- जबलपूरचे पोलिस पथक मुलीचा भाई, काका आणि आत्याला घेऊन नागपूरमध्ये पोहोचले. त्यांनी गंगा-जमुना येथील एका कोठ्यातून शिल्पाला मुक्त केले. 
- पोलिसांची रेड पडताच कोठ्याची मालकीन फरार झाली होती. 
- 12 वर्षांपूर्वी शिल्पाला विकत घेणाऱ्या कोठेवालीने तिचे नाव बदलले होते, आणि बदललेले नाव तिच्या हातावर गोंदले होते. 
- तिचे आधार कार्डही तयार करण्यात आले होते. 
- जेव्हा-केव्हा पोलिसांचा छापा पडेल तेव्हा कोठेवाली तिला स्वतःची मुलगी सांगायची.
आईचा झाला मृत्यू
- मुलीची विक्री केल्यानंतर आई पतीलाही सोडून पळून गेली होती. शिल्पाच्या नातेवाईकांनी सांगितले की चार-पाच वर्षांपूर्वी तिच्या आईचा मृत्यू झाला आहे. 
- शिल्पाच्या कुटुंबात आता तिचे वडील आणि भाऊ आहे. तो मोलमजुरी करतो.

Post a Comment

 
Top