0
अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प 11 दिवसांच्या आशिया दौऱ्यावर; भारतात येणार नाही, मोदींची भेट घेणार

वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 3 ते 14 नोव्हेंबर दरम्यान पहिल्या आशिया दौऱ्यावर येत आहेत. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्यात भारत वगळून जपान, साऊथ कोरिया, चीन, व्हिएतनाम आणि फिलिपिन्स या देशांच्या भेटींचा समावेश आहे. ट्रम्प भारतात येणार नसले तरी मोदींसोबत त्यांची भेट होण्याची शक्यता आहे.
नॉर्थ कोरियाने अलिकडच्या काळात केलेल्या आगळिकीच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. 3 सप्टेंबरला नॉर्थ कोरियाने हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली होती. 15 सप्टेंबरला जपानवरुन इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक क्षेत्रणास्त्र डागले होते. त्यानंतर अमेरिकेने नॉर्थ कोरियावरुन F-35B आणि B-1B बॉम्बर्स उडवले होते.
दोन परिषदांना लावणार हजेरी
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व्हिएतनाममध्ये आशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक को-ऑपरेशन (APEC) आणि फिलिपिन्समध्ये असोसिएशन ऑफ साउथ इस्ट एशियन नेशन्स (आसियान) परिषदेला उपस्थित राहाणार आहेत. 
- ट्रम्प यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलानिया देखील आशिया दौऱ्यावर येणार आहेत. 
- आसियान परिषदेला भारत उपस्थित राहाणार आहे. त्यामुळे येथे मोदी आणि ट्रम्प यांची भेट होऊ शकते. 
- एका डिप्लोमॅटचे म्हणणे आहे की ट्रम्प यांचा आशिया दौरा केवळ आशियाच्या पॉलिसीजसाठी महत्त्वाचा नसून यामुळे संपूर्ण साऊथ-इस्ट रिजनला फायदेशीर ठरणार आहेत.
ट्रम्प यांच्या दौऱ्यात भारत नाही
- पंतप्रधान नरेंद्र मोदी जूनमध्ये अमेरिकेत गेले होते. त्यावेळी त्यांनी ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले होते. 
- मात्र नोव्हेंबरमधील ट्रम्प यांच्या आशिया दौऱ्यात भारत भेटीचे नियोजन नाही.

Post a Comment

 
Top