0


रायपूर - छत्तीसगडच्या गरियाबंदमध्ये देशातील सर्वात लहान हरीण पाहण्यात आले आहे. हा फोटो सीतानदी टायगर रिझर्व्हमध्ये बिबट्यांवर नजर ठेवण्यासाठी लावलेल्या कॅमेऱ्यांत कॅप्चर झाला. सर्वात छोटा असलेल्या हरिणाला माऊस डियर या नावाने ओळखले जाते.
112 वर्षांनी आढळले अस्तित्व
- माऊस डियरचा सर्वात पहिला फोटो 1905 मध्ये समोर आला होता. आता 112 वर्षांनी या प्राण्याचा फोटो आढळला आहे. त्या काळी दुर्लभ जनावरांचे फोटो एका परदेशी नागरिकाने क्लिक केले होते.
- हे प्रजात लुप्त होण्याच्या काठावर आहे. अशा वेळी याच्या अस्तित्वाचा पुरावा मिळाल्याने वन विभाग आणि पशुप्रेमींमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
- या वर्षी मे आणि जून महिन्यात सीतानदी अभयारण्यात लावलेल्या कॅमेऱ्यांच्या ट्रॅपिंगदरम्यान या प्राण्याचा अस्तित्वाचा पुरावा मिळाला. तेव्हापासून यांना वाचवण्यासाठी काम केले जात आहे.
कसा असतो हा प्राणी?
- हा दुर्लभ प्राणी दिसायला क्यूट आणि खूप लाजराबुजरा असतो. याची लांबी मुश्किलीने 15 इंच असते. याला इंडियन चेर्वेाटेन नावानेही ओळखले जाते.
येथे आढळतात माऊस डियर
- माऊस डियर छत्तीसगडशिवाय केरला, तामिळनाडू, राजस्थान, झारखंड आणि मध्यप्रदेशात आढळतो. वेळोवेळी यांच्या अस्तित्वाची माहिती समोर आली आहे.

Post a Comment

 
Top