
अकोट - कृषी विद्यालयात वर्ग मध्ये शिकत असलेल्या १० वर्षीय विद्यार्थिनीचा शिक्षकाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना शहरात घडली.
कृषी विद्यालयात वर्ग 5 मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनीला शिक्षक जयंत वावगे याने त्रस्त केल्याने विद्यार्थिनी भयभीत झाली होती. ती आजारी झाल्यागत स्थितीमुळे पालकांनी तिच्या सर्व चाचण्या केल्या. मात्र, सर्व ठिक निघाल्याने पालकांनी मुलीला विश्वासात घेऊन माहिती विचारली. त्यावर मुलीने शिक्षक जयंत वावगे नेहमीच विनयभंग करत असून, हा प्रकार कोणाला सांगितला तर तुला तुझ्या कुटुंबीयांना जीवाने मारून टाकील, अशी धमकी दिल्याचे पीडितेने कथन केले. पोलिसांनी जयंत वावगेविरुद्ध विनयभंग व जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हे दाखल केले.
Post a Comment