0
रात्री 10 वाजता हनीप्रीतला यायचा बाबाचा SMS, करायचा असली डिमांड

सिरसा - दोन साध्वींवर बलात्काराच्या आरोपात दोषी ठरलेल्या राम रहिमची कथित मानस कन्या हनीप्रीतबद्दल खळबळजनक खुलासा झाला आहे. हनीप्रीतची जिम ट्रेनर आणि एका साध्वीने तिच्याबद्दल अनेक पडद्याआडच्या गोष्टी सांगितल्या आहेत. हनीप्रीतच्या मैत्रिणने सांगितले की बाबाचा दरबार लागला की त्याचवेळी राम रहिम मुलींवर नजर फिरवून एखाद्या मुलीला हेरायचा. मग रात्री 10 वाजता हनीप्रीतला SMS येत होता की ही मुलगी पाहिजे. बाबा सध्या तुरुंगात आहे तर हनीप्रीत फरार आहे.

मोठ्या आनंदाने जात होत्या मुली, बाहेर आल्यानंतर होत होती बोलती बंद 
- डेऱ्यामध्ये हनीप्रीतची मैत्रिण आणि पूर्वाश्रमीची साध्वी राहिलेल्या एका मुलीने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की हनीप्रीत आणि राम रहिम यांच्यात कोणतेच पवित्र नाते नव्हते, त्यांचे संबंध हे अतिशय वाईट होते. 
- पूर्वाश्रमीच्या साध्वीने सांगितले की बाबाचा दरबार लागला की हा खेळ सुरु व्हायचा. बाबा नजरनेचे मुली हेरायचा आणि रात्री 10 वाजले की हनीप्रीतला मेसेज करुन पसंत असलेल्या मुलीला पाठवून देण्यास सांगायचा. 
- साध्वीचा आरोप आहे की हनीप्रीत बाबाला मुलींचा सप्लाय करत होती. जेव्हा पूर्वाश्रमीच्या साध्वीला विचारले की, मुलींना बाबाकडे पाठवण्यासाठी त्यांना फूस लावली जात होती की त्यांना धमकावले जात होते, की धकमावले जात होते, नेमकी कोणती पद्धत त्यासाठी आवलंबली जात होती. तर तिने खुलासा केला की मुली मोठ्या आनंदाने खूश होऊन जात होत्या.
आत जाताना आनंदून जात होत्या मुली, बाहेर आल्यावर बनायच्या गुंगी गुडिया
- बाबाला डेऱ्यामध्ये पिताजी किंवा पापाजी म्हटले जायचे. जेव्हा मुलींना बाबाने बोलावले असे सांगितले जायचे तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार उरत नव्हता. पापाजीने आपल्याला बोलावले आहे याच आनंदात त्या राहात होत्या. मात्र जेव्हा बाबाच्या गुहेतून परत यायच्या तेव्हा त्यांची बोलतीच बंद झालेली असायची. 
- एकदा हनीप्रीतने मलाही बाबाकडून 'माफी' मिळवून देण्याचे म्हटले होते. मात्र मला या माफीचा अर्थ माहित होता, आतमध्ये माफीच्या नावाने काय केले जात होते, हे सर्व आधीपासून माहित होते. 
- आतमध्ये गेलेल्या मुली नंतर ब्र शब्द काढत नव्हत्या. जणू काही त्या 'गुंगी गुडिया' होऊन जायच्या. 
- पूर्वाश्रमीच्या साध्वीच्या म्हणण्यानुसार हनीप्रीत ही बाबाची सर्वात मोठी राजदार होती. डेरामध्ये तिचा शब्द कधीही खाली पडत नव्हता. हनीप्रीतनेच बाबाला त्याच्या कुटुंबापासून वेगळे केले होते. 
- राम रहिमला दोन मुली आहेत, मात्र त्या कधीच बाबासोबत दिसत नाही. बाबाची ही मानस कन्याच (हनीप्रीत) जिथे-तिथे त्याच्या सोबत राहायची.
गरीबी हटवण्यासाठी फिल्म तयार करायची हनीप्रीत
- हनीप्रीतने चित्रपटांचा मार्ग का स्वीकारला या प्रश्नाच्या उत्तरात साध्वी म्हणाली, सर्वांना माहित आहे की हनीप्रीत गरीब घरातील होती. फतेहाबादला तिचे आई-वडील किरायाच्या घरात राहात होते, नंतर डेऱ्यात राहायला आले. 
- डेऱ्यात राहायला आल्यानंतर हनीप्रीत बाबाच्या खास गोटातील एक महत्त्वाची व्यक्ती झाली. त्यानंतर चित्रपटात काम केल्यानंतर तरी तिचे आयुष्यच बदलून गेले.
बाबाला हनीप्रीत घेऊन आली चित्रपटांत 
- हनीप्रीतच्या मैत्रिणीला विचारले की बाबा हनीप्रीतला चित्रपटात घेऊन आले की हनीप्रीतने बाबाला लाँच केले. यावर मैत्रिणीने सांगितले, हनीप्रीतने संपूर्ण डेऱ्यावर आपला कब्जा केला होता. तिनेच बाबाला चित्रपटात लाँच केले. 
- राम रहिमसोबत ती चोविस तास राहात होती. बाबानेही सर्वकाही तिच्या हवाली करुन दिले होते. तिच्या शिवाय बाबाचे पान हालत नव्हते.

Post a Comment

 
Top